निवासी डॉक्‍टरांचा बेमुदत संपाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

लातूर आणि अंबेजोगाई येथील सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्‍टरांनी जानेवारीपासूनच्या प्रलंबित विद्यावेतन मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (ता. 8) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई - लातूर आणि अंबेजोगाई येथील सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्‍टरांनी जानेवारीपासूनच्या प्रलंबित विद्यावेतन मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (ता. 8) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 

या निवासी डॉक्‍टरांच्या बेमुदत संपाला राज्यभरातील निवासी डॉक्‍टरांनी पाठिंबा दिला आहे. राज्यातील निवासी डॉक्‍टर आपापल्या रुग्णालयांत काळ्या फिती लावून आणि फळे विकून निषेध व्यक्त करणार आहेत. या दोन्ही रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांना प्रलंबित विद्यावेतन 4 एप्रिलपर्यंत दिले जाईल, असे आश्‍वासन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) दिले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे विद्यावेतन मिळेपर्यंत बेमुदत संप सुरू राहील, अशी माहिती सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेने दिली आहे. 

प्रतिक्रिया 
लातूर आणि अंबेजोगाई या दोन्ही रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांना प्रलंबित विद्यावेतनाची रक्कम आम्ही दिली आहे. त्यांना मंगळवार किंवा बुधवारपर्यंत विद्यावेतन मिळेल. 
- डॉ तात्याराव लहाने, अतिरिक्त संचालक,  वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय 

Web Title: Resident doctor strike warning