अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर?

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जून 2019

- लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर दिला होता राजीनामा.

- पक्षाच्या बैठकीत राजीनामा मंजूर होण्याची शक्यता.

नवी दिल्ली : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामा मंजूर केला जाणार असून, त्यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत चव्हाण यांच्या राजीनाम्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. या पराभवाची जबाबादारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे आता यावर या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. 

राज्यातील परिस्थितीसाठी आढावा बैठक

येत्या दोन-तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resignation of Ashok Chavan may be accepted in Congress Committee Meeting