चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल दोन वर्षांपासून प्रलंबित

चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल दोन वर्षांपासून प्रलंबित

एकलहरे- कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल अजूनही लागलेला नाही. दोन वर्षांपासून पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत, त्यामुळे कलाशिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल तत्काळ जाहीर करावेत व मागील दोन वर्षांचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय सांगळे यांनी केली.

शासकीय चित्रकला परीक्षा "इंटरमिजिएट' पास झालेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षा पास होताना गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त गुण दिले जात आहेत. पहिल्या वर्षी "अ' श्रेणीसाठी 15, "ब' श्रेणीसाठी दहा, व "क' श्रेणीसाठी पाच अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र एकाच वर्षात निर्णय बदलून गुण कमी करण्यात आले व सात, पाच, तीन असे श्रेणीनुसार गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, इंटरमिजिएटसोबत एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले. या निर्णयाचा मागील दोन्ही वर्षी विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला. चित्रकला परीक्षांना महत्त्व प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली, त्यामुळे कलासंचालनालयावर कामाचा ताण वाढला. त्यामुळे अजूनपर्यंत 2018 च्या परीक्षांचा निकाल लागलेला नाही. तसेच, विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून प्रमाणपत्रेही मिळालेली नाहीत.

चालू वर्षी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बोर्डाकडून अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबर 2018 व विद्यालयातर्फे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2019 देण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com