शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून साठ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई ः शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्यासाठी सरकारने माजी निवृत्त सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांची एक समिती नेमली आहे.

खटुआ या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. तर या समितीमध्ये वित्त विभागाचे प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, संचालक, लेखा व कोषागरे आणि सदस्य सचिव म्हणून वित्त विभागातील सेवा चारचे उपसचिव यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचेही निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी वेळोवेळी शासकीय कर्मचारी संघटनांनी केली होती.

Web Title: retirement age to 60 in govt services