Maharashtra: शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra: शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे

Maharashtra: शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे

राज्यात दोन अडीच महिन्यापूर्वी शिंदे-फडवणीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे आणि फडणवीस गटाकडून 18 आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यांतील मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे. अशातच सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचा वेग आता वाढेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण सचिवांना देण्यात आलेले विशेष अधिकार शिंदे फडणवीस सरकारने आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या कामाचा वेग वाढण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार उशिरा झाल्याने सचिवांना विशेष अधिकार सरकारकडून देण्यात आले होते. कोणत्याही खात्याचं काम अडून राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने आणि खातेवाटप पूर्ण झाल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 4 ऑगस्टला शिंदे फडणवीस सरकारने काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय झाल्याची टीकाही सरकारवर करण्यात आली होती. अखेर सचिवांकडील हेच अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बहाल करण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

Web Title: Rights Given To Secretaries Has Again Reversed Back Given To Insisters By Maharashtra Shinde Fadnavis Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..