बलात्कारप्रकरणी कठोर शिक्षाच योग्य 

बलात्कारप्रकरणी कठोर शिक्षाच योग्य 

मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना दिलेली फाशी योग्यच आहे, असा युक्तिवाद महाधिवक्‍त्यांनी करत याप्रकरणी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची पाठराखण केली. एखाद्या महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला याचा अर्थ त्या नराधमास कळत नसेल तर त्या बलात्काऱ्याला कठोरातील कठोर शिक्षाच योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (ई) या कायद्यातील नव्या दुरुस्तीला आव्हान देत शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. फाशीच्या शिक्षा ठोठावलेल्या या तिघा आरोपींच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुरू आहे. बलात्कारप्रकरणी दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर ठाम राहत राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद शुक्रवारी संपविला. 

बलात्कारविरोधी कायद्यात जगातील आघाडीच्या राष्ट्रांमधील परिस्थितीची माहिती खंडपीठाला देत न्यायालयाचा मित्र (अमायकस क्‍युरी) म्हणून नियुक्त केलेल्या आबाद फोंडा यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अमेरिकेत बलात्कार हा गुन्हा समाजाचा नसून फक्त पीडितेच्या दृष्टिकोनातून पाहिला जातो. बलात्काराच्या घटनेचे तिथे भांडवल होत नाही. दुसरीकडे भारताचा विचार केल्यास 1952 पासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, 2012 पर्यंत या गुन्ह्याने धोक्‍याची मर्यादाच ओलांडली, असा युक्तिवाद केला. त्यामुळेच या घटनेला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्याच्या उद्देशाने यासंदर्भातील कायद्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. दिल्लीतील निर्भया खटल्याला निर्णायक वेळी केंद्र सरकारने घटनेचे गांभीर्य समजून घेत कायद्यात दुरुस्ती केली, असा युक्तिवाद केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com