कोरोनासह राज्यात डिझेल किंमतींचा भडका; काही जिल्ह्यांतील दर नव्वदीजवळ...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 17 July 2020

पेट्रोल आणि डिझेच्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अमरावती, औरंगाबाद, परभणी आणि सोलापूर या जिल्हांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी विक्रम मोडला आहे.

 

मुंबई – देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या मागणी पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेच्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अमरावती, औरंगाबाद, परभणी आणि सोलापूर या जिल्हांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी विक्रम मोडला आहे. या जिल्ह्यांमध्ये डिझेलची किंमत 80 रुपये प्रती लीटरच्या वर गेली आहे. मुंबईमध्येही गुरूवारी डिझेल 79.40 रुपये प्रति लीटरवर पोहचले. तर ठाणे आणि नवी मुंबईत डिझेलची किंमत 79.50 रुपये इतकी होती. नागपूरमध्ये  70.96 प्रति लीटर होय डिझेलची प्रतिलीटर किंमत झाली आहे .

...नाहीतर राज्यात भूकंप येईल, यशोमती ठाकूर भाजपवर कडाडल्या

कोरोनाच्या कठीण दिवसांमध्ये सार्वजनिक वाहतूक बंद आहे. अशात परवानगी काढून खासगी वाहनाने होणाऱ्या वाहतूकीला याचा जबर फटका बसणार आहे. खासगी वाहतूकीचे सध्याचे दर आधीच खुप जास्त आहेत. त्यात वाढत्या डिझेलच्या किंमतीमुळे या वाहतूकीचे दर वाढतील. तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महाग होऊ शकते. परिणामी या वस्तूंच्या किंमती सुद्धा वाढतील.

ऑईल मार्केटींग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी अमरावती जिल्ह्यातील डिझेलची किंमत 80.72 रुपये प्रति लीटर, औऱंगाबादमध्ये 80.49 प्रतिलीटर, परभणी 80.12 प्रतिलीटर इतकी नोँदवण्यात आली. तर पेट्रोलच्या किंमतींमध्येही राज्यात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. परभणीतील पेट्रोलची किंमत 89.19 प्रतिलीटर, मुंबईत 87.19 प्रतिलीटर तर ठाणे आणि नवी मुंबईत 87.29 रुपये प्रति लीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात या दरवाढीचा फटका सर्वसामांन्यांनाही बसण्याची चिन्हे आहेत.

---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rise in diesel prices in the state