रितेश देशमुख ,रवी जाधव अडकले रोपवेत, अनुभवला खरा थरार

सुनील पाटकर
गुरुवार, 5 जुलै 2018

महाड : चित्रपटामध्ये एकापोक्षा एक थरारक दृश्ये देणारा रितेश देशमुख यांनी आज प्रत्यक्ष थरार अनुभवला. रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेला रितेश व त्याच्या सोबत असलेले दिग्दर्शक रवी जाधव व लेखक विश्वास पाटील व अनंत देशमुख चक्क रायगड रोपवेमध्ये अडकले. तांत्रिक बिघाडामुळे रोपवे मध्येच थांबला होता. अर्ध्या तासाने रोपवे प्रशासनाने प्रयत्न करुन रोपवे सुरु केल्याने या सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

चित्रपट अभिनेता व निर्माता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव व लेखक विश्वास पाटिल यानी आज रायगड किल्ल्याला भेट दिली व भर पावसात गड फिरले. पाचाड येथील अनंत देशमुख यांनी या तिघांना गडदर्शन घडवले. सायंकाळ रोपवेने खाली उतरत असताना रोपवेत बिघाड झाला व ट्रोली मध्येच थांबली. उंचावर असलेली ट्रॉली त्यात मुसळघार पाऊस व सोसाट्याचा वारा यांने ट्रॉली हलत होती. त्यामुळे सर्वांची पाचावर धारण बसली. आत बसलेल्या सर्वांनी हा थरार अनुभवला.

अर्ध्या तासानंतर हा बिघाड दुरुस्त झाल्यावर हे सर्व सुखरुप खाली उतरले. पावसाचा दिवस असल्याने व त्यात पावसाळी पेहराव असल्याने रितेश यांना फारसे कोणी ओळखले नाही. छत्रपती शिवरायांवर चित्रपट काढण्याचे रितेश यांचे नियोजन असुन त्या दृष्टिने त्यांची ही रायगड भेट होती. परंतु, हि भेट त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात राहणारी ठरली.

Web Title: Riteish Deshmukh, Ravi Jadhav stuck in the stereotype, the real thrill of the experience