राज्यातील रस्ते अपघातांत यंदा ६.८ टक्के घट

state-accident
state-accident

मुंबई - राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत या वर्षी ६.८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच दहा महिन्यांत २७ हजार ३६३ अपघात झाले. म्हणजेच रस्ते अपघातांत १,९८८ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाने दिली आहे. 

रस्त्यांवर होणारे जीवघेणे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने रस्ते सुरक्षा कक्ष स्थापन केला असून, प्रत्येक जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हा समित्यांच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांना नेमण्यात आले असून वाढते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा समित्यांना दर वर्षी अपघातांमध्ये दहा टक्के घट करण्याचा लक्ष्यांक दिला होता. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, दिशादर्शक फलक बसवणे, झेब्रा क्रॉसिंग रंगवणे, प्रवासी मार्गदर्शक फलक लावणे आदी उपाययोजना केल्या. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत प्रत्येक जिल्ह्यातील अपघातांमध्ये घट झाली असून, राज्यातील अपघातांमध्ये ६.८ टक्के घट झाली आहे. 

रस्ता सुरक्षेतील सहभाग  
परिवहन विभाग, वाहतूक पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, शालेय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, मालवाहतूकदार संघटना, महापालिका, नगरपालिका, माहिती व जनसंपर्क विभाग, एसटी महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com