विहामांडवाचा रस्ता सात वर्षांपासून बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

विहामांडवा (ता. पैठण) : विहामांडवा हे पैठण तालुक्‍यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेले गाव; परंतु खराब रस्ते व धोकादायक पुलामुळे बाजारपेठ भकास होत चालली आहे. टाकळी अंबड ते विहामांडवा रस्त्यावर असलेला जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील पूल धोकादायक असल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने या पुलावरील वाहतूक गेल्या सात वर्षांपासून बंद केली आहे.

त्यामुळे या रस्त्याची अवस्था "असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे. या प्रश्‍नाबाबत पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. त्यामुळे विहामांडवा, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव, रामनगर, विठ्ठलनगर, हनुमाननगर आदी गावांतील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी अशा सर्वांनाच इच्छितस्थळी जाण्यासाठी सुमारे 12 किलोमीटरचा फेरा पडतो. 
 
Web Title: road has been closed for seven years