बीडमधील रस्ते प्रकल्प मार्गी लागणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - बीड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल व इतर प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधान्य दिले आहे. 

या प्रश्नांसंदर्भात ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पाटील यांची भेट घेतली. 

परळीत समांतर रेल्वे उड्डाण पूल व अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय, रस्ते व राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती यासह विविध प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा आदेश पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिला. बीड जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. बैठकीस औरंगाबादचे मुख्य अभियंता सुरकुटवार, अधीक्षक अभियंता श्रीनिवास कातकडे, कार्यकारी अभियंता एन. टी. पाटील उपस्थित होते. 

Web Title: Road project will solve