रस्ते गैरव्यवहारावरून शिवसेना विरुद्घ कॉंग्रेस, भाजप 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने महापालिकेच्या कारभाराबाबत बरीच वादग्रस्त वक्तव्य केली. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले. 

उत्तरावर समाधान न झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी हरकत घेतली. 

डॉ. पाटील यांनी सांगितले, की मुंबई महापालिकेच्या रस्ते गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार 2016 मध्ये मिळाली होती. त्याची चौकशी सुरू असून, या प्रकरणात अनेक ठेकेदार, अभियंते आणि पालिका अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. तसेच या गैरव्यवहाराच्या चौकशीचे काम पालिका आयुक्तांकडून सुरू आहे. त्यावर भाजपचे आमदार योगेश सागर यांनी याची "एसआयटी' मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र जानेवारी 2017 ला दिलेल्या रस्ते कामाबाबत अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्याची चौकशी सुरू नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. भाजपचे आशिष शेलार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, कॉंग्रेसचे अस्लम शेख यांनीही या चर्चेत भाग घेतला. 

हा प्रश्न चांगलाच तापू लागल्याचे दिसताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर करत या प्रकरणावर पडदा टाकला. दरम्यान, राज्यमंत्री डॉ. पाटील यांची या प्रश्नाला उत्तर देताना चांगलीच राजकीय अडचण होत असल्याचे दिसून येत होते. 

Web Title: road scam issue