रस्ते सुरक्षिततेसाठी 'ब्लूमबर्ग'चे सहकार्य

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "ब्लूमबर्ग'चे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरून आज अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमन झाले. भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सूल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री न्यूयॉर्ककडे रवाना झाले. राज्यातील रस्ते सुरक्षिततेबाबतच्या उपक्रमांना ब्लूमबर्गचे मोठे पाठबळ लाभले आहे. त्याबाबत या समूहाशी फेब्रुवारी 2015 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार झालेल्या उपाययोजनांमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याबरोबरच अशा घटनांमधील जीवितहानीदेखील कमी करण्यात यश आले आहे.

महाराष्ट्रासोबतच्या सहकार्याची व्याप्ती वाढवितानाच राज्याच्या फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसोबत संयुक्तरीत्या काम करण्याचा मनोदय ब्लूमबर्ग यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

Web Title: road security bloomburg support devendra fadnavis