सेलूत बॅंकेवर दरोडा; 20 लाख लंपास

सेलूत बॅंकेवर दरोडा; 20 लाख लंपास

सेलू : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची येथील शाखा फोडून दरोडेखोरांनी 19 लाख 80 हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. 2) पहाटे घडली. 

शहरातील सेलू-पाथरी रस्त्यावरील एका शॉपिंग कॉप्लेक्‍समध्ये जिल्हा बॅंकेची शाखा आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी शाखेचे मुख्य लोखंडी गेट, आतील दरवाजे तोडले. त्यानंतर तिजोरी फोडून 19 लाख 80 हजार रुपये घेऊन पोबारा केला. मुख्य व्यवस्थापक भागवत काळे हे सकाळी साडेदहाला शाखा उघडण्याकरिता आले असता, त्यांना मुख्य गेट तोडल्याचे लक्षात आले. त्यांनी सेलू पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्वान पथकासही पाचरण केले. श्वान पथकाने शाखेपासून समोर असलेल्या रस्त्यापर्यंत माग काढला. घटनास्थळी चोरट्यांच्या बोटांचे ठसे, तसेच त्यांच्या वाहनाचे चाक (स्टेपनी) पोलिसांना मिळाले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. 

दरम्यान, सेलू पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून, तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन व सेलू पोलिसांचे एक पथक ठिकठिकाणी रवाना करण्यात आले आहे. जालना, बुलडाणा व बीड जिल्ह्यात दरोडेखोरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com