जुन्नरला गोळेगाव व अलदरेला बंद घरे फोडून 58 हजाराचा ऐवज लंपास  

दत्ता म्हसकर
सोमवार, 14 मे 2018

जुन्नर -  जुन्नर जवळील गोळेगाव व अलदरे येथे शनिवारी रात्री (ता.12)  घरफोडीच्या तीन घटना घडल्या. या मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या तीन घरफोडीत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा  सुमारे 58 हजाराचा ऐवज चोरट्यानी लांबविला.   

गोळेगाव येथील रामभाऊ भोईर, सुनील सरजीने, व अलदरे येथील गोरक्ष सरजीने यांनी याबाबतची फिर्याद जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. घरे बंद असल्याचे पाहून चोरट्यानी शनिवारी रात्री या घरावर डल्ला मारुन ऐवज पळविला. तिनही ठिकाणी दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यानी घरात प्रवेश केला असल्याने या घरफोड्या करणारे एकच असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलीस शिपाई भरत मुठे व अलदरेचे पोलीस पाटील सुमित लोहटे  यांनी घटनास्थळी जाऊन घरफोडीची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक  कैलास घोडके अधिक तपास  करत आहेेेत . 

Web Title: Robbery in Junnar