वनतलावात आढळले रॉकेटचे अवशेष

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकाशातून पडलेल्या वस्तू आढळून येत आहेत
rocket objects
rocket objectssakal

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकाशातून पडलेल्या वस्तू आढळून येत आहेत. सिंदेवाही, ब्रह्मपुरीपाठोपाठ आता चिमुरातील तळोधी वनतलावाच्या परिसरात गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. ६) रॉकेटचे अवशेष आढळले. हे अवशेष उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

गेल्या शनिवारी आकाशातून आगीच्या स्वरूपातील काही वस्तू जिल्ह्यात कोसळल्या. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे रिंग आणि लोखंडी गोळा आढळून आला. त्यांनतर पवनपार, मरेगाव, आसोलामेंढा, वर्धा जिल्हा, ब्रह्मपुरी तालुक्यातील बोदरा एकरा जंगल क्षेत्रात लोखंडी गोळे सापडले. त्यात आता चिमूर तालुक्यात सहावा गोळा सापडला. तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, वनरक्षक एस. एस. टापरे, वनरक्षक आणि मजुरांना आज सकाळी तळोधी उपक्षेत्रातील तळोधी बिट कक्ष क्रमांक ४५ मधील वनतलावात गोलाकार वस्तू आढळली.

चिमुरात आढळलेला हा गोळा विद्युत यंत्रांना तारांची बाईंडिंग असल्याप्रमाणे गोळा आहे. त्यामुळे हे नेमके कशाचे अवशेष आहेत, याबद्दल उत्सुकता लागली आहे. अवशेष ताब्यात घेतले आहेत.

- संजय सांगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, चिमूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com