Rohit Pawar : 'महाराष्ट्र वाऱ्यावर, भाजप नेते कसबा, चिंचवडमध्ये... निवडणुकीसाठी किती पैसे खर्च?'

Rohit Pawar
Rohit PawarSakal

नाशिक : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. "भाजपकडून कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचे काम करून घेतले जात आहे, सध्या महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून सगळे भाजप नेते कसबा आणि चिंचवडमध्ये आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने किती पैसे खर्च केले आहेत ते पाहावं लागेल." असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे. नाशिक येथे माध्यमांशी ते बोलत होते.

Rohit Pawar
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, "यामध्ये राजकारण न आणता या निर्णयाचं स्वागत आपण केलं पाहिजे पण आपण नामांतराचे विषयच कायम घेत राहिलो तर बेरोजगारी, शेतकरी, मजूर, असंघटित क्षेत्राकडे दुर्लक्ष होईल" असं मत रोहित पवार यांनी केलं आहे.

Rohit Pawar
Viral Video : स्टूलवर बसून दूध काढत होती 'पापा की परी'; गायीने मारली लाथ अन्...

दरम्यान, फक्त मराठा मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्ही बंड केलं अशा गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी टोला लावला. "सध्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत पण कर्तृत्व काहीच नाही असं म्हणता येईल का? आज जातीय राजकारण केल जात असून प्रमुख विकासाच्या मुद्द्यापासून लोकांना दूर ठेवणे अयोग्य आहे." असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com