Rohit Pawar: रोहित पवारांच्या अडचणीत वाढ! बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या MD वर गुन्हा दाखल

15 ऑक्टोबरच्या आधी गळीत हंगाम सुरू केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Rohit Pawar
Rohit Pawaresakal

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीचा बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 ऑक्टोबरच्या आधी गळीत हंगाम सुरू केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

या वर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु याधीच आमदार रोहित पवार यांचा कारखान्यात 12 तारखेपासून गळीत हंगाम सुरू केला अशी तक्रार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे देण्यात आली होती. त्यानंतर साखर आयुक्तांनी याबाबत चौकशी समिती नेमली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी करून रोहित पवार यांना क्लीनचिट दिली.

Rohit Pawar
Sangli Crime News: भाजपा नगरसेवकाची भरदिवसा हत्या; आधी गाडीवर गोळीबार, मग डोक्यात दगड घातला

दरम्यान संपूर्ण चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांना क्लीनचिट देण्यात आली होती. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांचे नाव अजय देशमुख असून त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर सहकार विभागाकडे राम शिंदे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

Rohit Pawar
Old Pension Scheme : नवीन पेन्शन योजनेमध्ये 'या' सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली होती. राम शिंदे यांनी याबाबतचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले होते. 15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना कारखाना सुरू केल्याबाबतची तक्रार राम शिंदे यांच्याकडून साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती.

15 ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. हा कारखाना 10 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच आज सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राम शिंदे यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com