गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत केला गनिमी कावा अन्....

पोलिसांनी रॅली रोखल्यानंतर बॅरिकेटस्‌ तोडून कार्यकर्ते घुसले.
BJP-Gopichand-Padalkar
BJP-Gopichand-Padalkaresakal

सांगली : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर (AhilyaDevi Holkar) स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्र्वभूमीवर आज आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी रॅली काढली. पोलिसांनी रॅली रोखल्यानंतर बॅरिकेटस्‌ तोडून कार्यकर्ते घुसले. परंतू शंभर मीटर परिसरात पुन्हा रोखल्यानंतर ठिय्या मांडला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. आमदार पडळकर यांनी गनिमी काव्याने स्मारक परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतू तो अयशस्वी ठरला. त्यानंतर ‘ड्रोन’ कॅमेऱ्याद्वारे स्मारकावर पुष्पवृष्टी करून लोकार्पण करण्यात आले.

अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा संघर्ष पेटला. राष्ट्रवादीने २ एप्रिल रोजी अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा होणार असल्याचे जाहीर केले आहे. तत्पूर्वी या स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी जाहीर केले होते. या पार्श्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिसरात संचारबंदी लागू केली होती. स्मारकाभोवती शंभर मीटर परिसरात पोलिसांनी बंदोबस्ताचे कडे केले आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. आज लोकार्पण सोहळा कोणत्याही परिस्थितीत करणारच असा निर्धार भाजपने केला होता. त्यामुळे स्मारकाभोवती एक किलोमीटर परिसरात बॅरिकेटस्‌ लावण्यात आली होती.

BJP-Gopichand-Padalkar
महाराष्ट्रात साचलेली घाण जनताच साफ करेल; मिटकरींची भाजपावर टीका

आज दुपारी साडे तीनच्या सुमारास सर्कीट हाऊस परिसरात हजारो कार्यकर्ते दुचाकीवरून जमले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रॅलीस प्रारंभ झाला. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार, ॲड. स्वाती शिंदे, संगीता खोत आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे नगरसेवक, नगरसेविका यासह पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीमध्ये पिवळे झेंडे, पिवळ्या टोप्या घातलेले तसेच कपाळावर भंडारा लावून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘यळकोट..यळकोट जल मल्हार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत रॅलीस प्रारंभ झाला. सर्कीट हाऊसपासून रेल्वे उड्डाणपूलावरून रॅली संजयनगर पोलिस ठाणेमार्गे चिन्मय पार्क येथे आली. तेथून शंभरफुटी रस्त्याने लक्ष्मी मंदिर चौकात आली. तेथून भारत सूतगिरणी चौकात पोलिसांनी बॅरिकेटस्‌ लावून रोखले. फटाक्याची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी बॅरिकेटस्‌ पाडून स्मारकाच्या दिशेने धाव घेतली.

BJP-Gopichand-Padalkar
Photo l अखेर ड्रोनचा वापर करुन स्मारकावरती फुले टाकली- पडळकर

राजे मल्हारराव होळकर चौकात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. आमदार पडळकर सूतगिरणी चौकातून चालत होळकर चौकात आले. तर मागे हजारोंचा जमाव होता. पोलिसांनी रोखल्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला. ढोल-ताशाचा प्रचंड गजर सुरू झाला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी रोखले तरी लोकार्पण करणारच असे आमदार पडळकर यांनी जाहीर करत कोणतेही गालबोट लावू देऊ नका असे आवाहन केले.

एकीकडे पोलिसांनी आंदोलकांना रोखले असताना काही वेळाने ड्रोन कॅमेरे हवेत फिरताना दिसल्यामुळे पळापळ झाली. आमदार पडळकर गनिमी काव्याने अन्य मार्गाने स्मारकाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे कडे असल्यामुळे त्यांना आतमध्ये जाता आले नाही. परंतू त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पुष्पवृष्टी करून लोकार्पण केल्याचे जाहीर केले. तर परिसरात ‘जामर’ मुळे ड्रोन कॅमेरा पडल्याची चर्चा होती. पोलिस प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याने पुष्पवृष्टी केल्याबाबत माहितच नसल्याचे सांगितले. सायंकाळी सहापर्यंत होळकर चौकात गर्दी थांबून होती.

BJP-Gopichand-Padalkar
शरद पवारांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये- सदाभाऊ खोत

अश्रुधुराच्या नळकांड्यासह सशस्त्र पोलिस-

पोलिसांनी शंभर मीटर परिसरातच आंदोलकांना रोखण्यासाठी शेकडो पोलिस तैनात होते. अश्रुधुराच्या नळकांड्यासह जमावाला थोपवण्यासाठी काहीजण सज्ज होते. तसेच अग्निशमन दलाची गाडी, रूग्णवाहिकाही होती. त्याशिवाय परिसरातील उंच इमारतीवर सशस्त्र पोलिस होते.

‘‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर मेंढपाळाच्याहस्ते ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गुलाब फुलांची वृष्टी करून लोकार्पण करण्यात आले आहे. डिजिटल इंडियामध्ये आपण बदलले पाहिजे. पोलिसांनी कितीही विरोध केला असला तरी आम्ही आमचे काम केले आहे.’’

आमदार गोपीचंद पडळकर

ढोलाचा दणदणाट

होळकर चौकात रोखल्यानंतर आमदार पडळकर यांनी ढोल हातात घेऊन वाजवला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर परिसरात अनेक ढोलचा दणदणाट सुरू होता. तसेच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.

परिसरात जामर

पोलिसांनी स्मारकाच्या शंभर मीटर परिसरात जामर बसवले होते. त्यामुळे अनेकांना मोबाईलवरून संभाषण करता येत होते. परंतू व्हीडिओ व्हायरल करण्यास अडथळे येत होते. याच जामरमुळे एक ड्रोन कॅमेरा पडला. तर ड्रोन उडवणाऱ्या दोन ऑपरेटरला पोलिसांनी परिसरात ताब्यात घेतले.

अशी झाली पुष्पवृष्टी

पोलिसांनी रस्ते रोखल्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पुष्पवृष्टी करण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी परिसरात ड्रोन कॅमेरे सज्ज ठेवले होते. एका कॅमेऱ्याला फुगा बांधून त्यामध्ये गुलाबाची फुले टाकली होती. स्मारकाच्यावतीने कॅमेरा आल्यानंतर फुग्याला करंट देऊन फुले थेट स्मारकावर पडतील अशी यंत्रणा केली होती. त्याप्रमाणे आमदार पडळकर यांचा हा डिजिटल गनिमी कावा यशस्वी ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com