राहुल गांधींसाठी रोशनची पदयात्रा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

खापरखेडा - तीन राज्यांत भाजपचा पराभव करून कॉंग्रेस मित्र पक्षाने दणदणीत विजय मिळविला. केंद्रातसुद्धा कॉंग्रेस मित्र पक्षांनी सरकार स्थापन करावे व युवा नेते राहुल गांधी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा बाळगून खापरखेडा चिचोली परिसरातील कॉंग्रेसच्या युवक कार्यकर्त्याने दिल्लीची पायी यात्रा सुरू केली आहे.

या 30 वर्षीय युवकाचे नाव रोशन संजय बागडे असे आहे. रोशनने दिल्लीला जाण्यासाठी 3 जानेवारीपासून वाकी येथे ताजुद्दीन बाबांचे दर्शन घेऊन पायी यात्रेला सुरवात केली. हातात तिरंगा झेंडा, काखेत बॅग, अंगावर राहुल गांधींचे चित्र रेखाटलेले टीशर्ट आणि जॅकेट घालून रोशन एकटाच दिल्लीच्या सफरीवर निघाला आहे. दररोज रोशन 25 किलोमीटर अंतर पायी चालतो.

खापरखेडयापासून दिल्लीचे अंतर जवळपास 1 हजार 59 किलोमीटर असून दिल्लीला पोहचण्यासाठी रोशनला दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

Web Title: Roshan Pedestrian to Rahul Gandhi