'आरपीआय'ची पुनर्बांधणी आवश्‍यक - आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली; मात्र एकाही ठिकाणी उमेदवार विजयी न झाल्याची खंत असून, मुंबईत जनमताने दिलेला कौल मान्य करून यापुढे रिपब्लिकन पक्षाची राजकीयदृष्ट्या पुनर्बांधणी करणार असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी केली. राज्यात 10 महापालिकांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असून रिपब्लिकन पक्षाने समर्थन दिल्यानेच भाजपला 31हून 80 जागांपर्यंत मजल मारता आली. भाजपच्या या यशात "आरपीआय'चा मोठा हिस्सा असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी निराश न होण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे

मुंबई महापालिकेत "आरपीआय'ने 19 जागा लढविल्या. त्या सर्व ठिकाणी सर्व उमेदवारांनी चांगली मते मिळविल्याचे आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्ष चळवळ म्हणून कार्यरत आहे. त्याबरोबरच रिपब्लिकन पक्षाची राजकीयदृष्ट्या पुनर्बांधणी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: rpi party necessary reconstruction