‘साखरे’च्या जीएसटीत नऊशे कोटींची घट

‘साखरे’च्या जीएसटीत नऊशे कोटींची घट

सोलापूर- मागील वर्षीचा दुष्काळ आणि यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत आलेल्या पुराचा फटका उसाला बसल्याने यंदा साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे. राज्यात गाळपासाठी आठ लाख २१ हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र शिल्लक असून, त्यातून ५४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल. त्यामुळे यंदा साखर उद्योगातून सरकारला गतवर्षीच्या तुलनेत ८८३ कोटी ३५ लाखांचा ‘जीएसटी’ कमी मिळेल, असे साखर आयुक्‍तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा ४५ कारखान्यांनीच गाळपासाठी अर्ज केले असून, एकाही कारखान्याला परवाना दिलेला नाही. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक साखर कारखाने असतानाही पुरामुळे तेथील उसाच्या उत्पादनात सुमारे ६० टक्‍के घट झाल्याचा अहवाल साखर आयुक्‍तालयास प्राप्त झाला आहे. मागील वर्षी साखर उद्योगातून सरकारला एक हजार ७४० कोटी रुपये जीएसटी मिळाला होता. यंदा सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यांनाच पुराचा तडाखा बसल्यामुळे साखर 

उद्योगातून मिळणाऱ्या जीएसटीत मोठी घट होईल, असे सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातील आलमट्टी धरण परिसरातील बदामी, विजयपूर, दावणगिरी येथील उसाचेही नुकसान झाले आहे. गुजरातमधीलही काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 

मागील वर्षीचा दुष्काळ आणि यंदा सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यांना बसलेला पुराचा तडाखा, यामुळे गाळप हंगाम लांबणीवर पडणार आहे. गाळपासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 
- दत्तात्रय गायकवाड, सहसंचालक (विकास), साखर आयुक्‍तालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com