आपसांत भांडल्याने दोघांचेही नुकसान - सरसंघचालक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आपसांत भांडल्याने दोघांचेही नुकसान होतं आहे, हे माहिती असुनही काहीजण भांडतात, असे अप्रत्यक्षपणे सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना आणि भाजप यांना सुनावले आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नागपूर : आपसांत भांडल्याने दोघांचेही नुकसान होतं आहे, हे माहिती असुनही काहीजण भांडतात, असे अप्रत्यक्षपणे सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना आणि भाजप यांना सुनावले आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्तास्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुनावले आहे.

पीक विम्याचे पैसे मिळणे पुन्हा लांबणीवर
 

या पाच ठिकाणी लागल्या झेडपीच्या निवडणुका

भागवत म्हणाले, 'स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असताना प्रत्यक्षात सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSSs Mohan Bhagwat in Nagpur on shivsena and BJP