आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठीची तिसरी प्रवेश फेरी जाहीर झाली. या सोडतीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास गुरुवार (ता. 11) पासून सुरुवात झाली.

मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठीची तिसरी प्रवेश फेरी जाहीर झाली. या सोडतीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास गुरुवार (ता. 11) पासून सुरुवात झाली. सोडतीनंतर पहिल्या दिवशी राज्यभरातून 421 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला; तर मुंबईतून केवळ 9 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

यंदा दोन सोडतीनंतरही तब्बल 49 हजार 754 जागा रिक्त राहिल्या आहेत; मात्र 10 जुलैला शिक्षण विभागाने राज्यस्तरीय तिसरी फेरी जाहीर केली. त्यात निवड झालेल्या पालकांना 11 जुलैला एसएमएस पाठवण्यात आले. एसएमएस मिळालेल्या पालकांनी 18 जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE admission third draw

टॅग्स