आरटीई ॲपकडे पालकांची पाठ

RTE
RTE

पिंपरी - आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी यंदा शिक्षण विभागाने मोबाईल ॲप विकसित केले. मात्र, अद्यापही पालकांची ॲपऐवजी संगणकीय ऑनलाइन प्रणालीला पसंती असून, ॲपद्वारे अर्ज भरण्याचा राज्यातील आकडा कसाबसा ७९५ पर्यंत पोचला आहे. एका आकडेवारीतून हे स्पष्ट झाले.  

आरटीई प्रवेशप्रक्रियेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत राज्यभरातून दोन लाख २२ हजार ८९५ अर्ज भरले गेले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजेच दोन लाख २२ हजार १०० अर्ज संगणकीय ऑनलाइन प्रणालीद्वारे प्राप्त झाले आहेत; तर शिक्षण विभागाने पालकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ऑनलाइनसह मोबाईल ॲपद्वारे केवळ ७९५ अर्ज भरले गेले आहेत. 

पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोबाईल ॲपचा वापर झालेला असून, ७९५ पैकी २०६ अर्ज पुण्यातून भरले गेले आहेत. तर, पुणे जिल्ह्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात ७३, कोल्हापूरमध्ये ५४, ठाण्यात ४८, नागपूरमध्ये ४३ आणि नाशिकमध्ये ४१ अर्ज ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत.

मोबाईलच अडचण
मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरण्यासाठी मोबाईल ॲन्ड्रॉईड असणे आवश्‍यक आहे. त्याबरोबरच स्मार्टफोनचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. मात्र, ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी असल्याचा विसर शिक्षण विभागाला पडलेला दिसतोय. अनेक पालकांकडे ॲपद्वारे अर्ज भरण्याची सुविधा नसल्याने ते मदत केंद्रातूनच ऑनलाइन अर्ज भरत असल्याचे दिसत आहे. परिणामी, ॲपच्या माध्यमातून अर्ज भरणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. 

स्मार्टफोन असल्याशिवाय मोबाईल ॲप डाउनलोड करता येत नाही. तसेच सरकारने या ॲपची जाहिरात करणे आवश्‍यक होते. ॲप डाउनलोड केल्यास ते लवकर सुरू होत नाही. ॲपचा वापर करण्याबाबत बहुतांश पालक अनभिज्ञ आहेत.
- शरण शिंगे, पालक 

‘पालकांच्या सोयीसाठी हे ॲप विकसित केले आहे. पण, त्याला पालकांचा प्रतिसाद फारच कमी आहे. पालकांनी त्याचा वापर करावा.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com