विधानसभेत गोंधळ; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

ब्रह्मदेव चट्टे
बुधवार, 15 मार्च 2017

विरोधकांसह सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले होते. या सर्व गडबडीत अध्यक्षांनी पुरवण्या मागण्या मंजूर केल्या. यानंतर गोधळ वाढल्याने कामकाज पंधरा मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले.

मुंबई : सलग चार दिवस सुट्ट्यांनंतर विधानसभेच्या कामकाजाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक ठाम होते. त्यामुळे दोन वेळा अर्धातासांसाठी व त्यानंतर 15 मिनीटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधकांना सत्ताधारी  शिवसेनेच्या व भाजपच्या आमदारांनी समर्थपणे साथ दिली. गोंधळातच पुरवण्या मागण्या व 4 विधयके मंजूर करत कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका ओळीचा कर्जमाफीचा प्रस्ताव मांडण्याचा आग्रह धरला. विरोधकांनी कर्जमाफीवर ठामपणे अग्रही भूमिका घेत कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला. विरोधकांना शिवसेनेच्या आमदारांनीही उभे राहत साथ दिली. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिल्यांदा अर्धा तास व त्यानंतर 12 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांचा शोकसभेची प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ कायम सुरू ठेवत वेलमध्ये उतरून घोषणा दिल्या. या गोंधळातच कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आल्या. तर लक्षवेधी सुचना पुढे ढकलण्यात आल्या.

विरोधकांसह सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले होते. या सर्व गडबडीत अध्यक्षांनी पुरवण्या मागण्या मंजूर केल्या. यानंतर गोधळ वाढल्याने कामकाज पंधरा मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर गोंधळामध्येच महानगरपालिका, नगर पंचायची, औद्योगिक नगरी सुधराना विधेयक, महाराष्ट्र शेतजमिन( जमिन धारण्याची कमाल मर्यादा) सुधारणा विधयेक आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग सुधारणा विधयेक, महाराष्ट्र ग्रामपंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती सुधारणा विधेयक मजूंर करण्यात आली. शिवसेना आमदारांनी अक्रमक होतअध्यक्षाच्या समोरच्या डायरवर चढून घोषणा दिल्या. गोंधळ वाढल्यामुळे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

Web Title: Ruckus in Maharashtra assembly session over farmers loan waiver