राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचे 

Radha Krishna Vikhe Patil
Radha Krishna Vikhe Patil

मुंबई : काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील  यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट झाले. नियमाप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याला विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागतो. तो अद्याप दिलेला नाही. पक्षश्रेष्ठींना भेटायला विखे पाटील दिल्लीला गेले नाहीत. ते मागील तीन दिवसांपासून प्रवरा लोणी मतदारसंघातच आहेत.

विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. विखेंच्या राजीनाम्याची बातमी म्हणजे खोडसाळपणा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. नगरमध्ये सुजय विखे पाटील यांनी केलेले बंड राष्ट्रवादी कॉंग्रेसने उभ्या केलेल्या अगतिकतेमुळे असल्याचा विखे पाटील यांचा दावा खोटा असल्याची भूमिका दिल्लीपर्यंत पोचली असली तरी, त्यांच्यावर निवडणूक होईपर्यंत कोणतीही कारवाई करणे शक्‍य नसल्याचे कळवण्यात आले आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक तंत्राने कॉंग्रेसला दुय्यम स्थान दिले असल्याचे बहुतेक नेत्यांचे मत आहे. प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याला तीनदा हरलेली जागा जिंकण्याची शक्‍यता असताना पोटच्या मुलासाठी सहकारी पक्षाकडून मिळवता आली नाही. कॉंग्रेस पक्षाची अवस्था एवढी दयनीय का झाली याचा विचार करावा, असे काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. त्यातच डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना पदावरून पायउतार होण्याचा निरोप दिलाच तर कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पद गमवावे लागेल, अशी चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यातील परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या विखेविरोधी मोहिमेला दिल्लीहून सध्या लाल बावटा दाखवण्यात आल्याचे समजते. सध्याच्या स्थितीत कोणतीही कारवाई करणे शक्‍य नसल्याने सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. 

डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारे किमान चार आमदार विधानसभेत आहेत. त्यातील एकजण त्यांच्या समर्थनार्थ केव्हाही राजीनामा देऊ शकेल हे लक्षात घ्या, असेही कळवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com