“….कंगनाची हुजरेगिरी करणारे आता विचारतील का कुठल्या अधिकारात हे केले?”

या प्रकरणातील गाफील अधिकारी व बाबूसह स्वयंघोषीतावर कारवाई झालीच पाहिजे
Rupali Patil Thombare and Kirit Somaiya
Rupali Patil Thombare and Kirit Somaiyaटिम ई सकाळ

किरीट सोमय्या (Kirit Somaiya)नेहमी त्यांच्या आरोप-प्रत्यारोपावरून चर्चेत येत असतात. अशात त्यांचा मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मंत्रालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासणे त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणावर राजकीय स्तरातून अनेकांनी प्रतिक्रिया देत सोमय्यांवर चांगलीच टिका केली आहे.

Rupali Patil Thombare and Kirit Somaiya
राज्यात सर्वांना हुडहुडी, मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पारा घसरला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी ट्वीट करत किरीट सोमय्या आणि या प्रकरणातील गाफील अधिकारींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रूपाली पाटील ठोंबरे म्हणतात, “स्वयंघोषित भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ मंत्रालयात जाऊन लपून फाईली चाळतात; कंगनाची हुजरेगिरी करणारे आता विचारतील का कुठल्या अधिकारात हे केले? या प्रकरणातील गाफील अधिकारी व बाबूसह स्वयंघोषीतावर कारवाई झालीच पाहिजे.”

Rupali Patil Thombare and Kirit Somaiya
वारेमाप घोषणा, मोफत वस्तू वाटपास आक्षेप; सर्वोच्च न्यायालय

या प्रकरणावरून प्रशासनाने किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवली असून दोन दिवसात उत्तर द्यावे अशी सूचना करण्यात आली आहे. सोबत ज्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर किरीट सोमय्या बसले होते त्या अधिकाऱ्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com