पेट्रोल-डिझेलवर एक रुपया अधिभार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - तेल कंपन्यांनी सोमवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली असताना त्याचा महाराष्ट्रातील वाहनचालकांना फायदा होणार नाही. कारण पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होताच राज्य सरकारने महसूल वाढविण्यासाठी इंधनावरील सरचार्ज एक रुपयाने वाढविला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल स्वस्त होऊनही, राज्यात एक रुपया अधिभार लागू केल्याने दर दोन रुपयांनी वाढले आहेत. 

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपये 16 पैशांची, तर डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपये 10 पैशांनी कमी केल्या होत्या. राज्य सरकारने मंगळवारी रात्री इंधनावर एक रुपया सरचार्ज वाढविण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. यामुळे या दर कपातीची महाराष्ट्रातील वाहनचालकांना फायदा होणार नाही. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी-जास्त करत असतात. 1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किंचित वाढ करण्यात आली होती. त्या वेळी पेट्रोलच्या किमतीत 1 पैसा, तर डिझेलच्या किमतीत 44 पैशांची वाढ करण्यात आली होती. 16 एप्रिल रोजी पेट्रोलच्या किमतीत 1 रुपया 39 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या किमतीत 1 रुपया 4 पैशांची वाढ झाली होती. 

Web Title: A rupee surcharge on petrol-diesel