‘साम’तर्फे पंढरीची वारी अनुभवण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद...’ अशा ओळींचा गजर करीत लाखो वारकरी विठुमाउलीच्या भेटीसाठी पंढरीकडे निघणार आहेत. परंतु इच्छा असूनही ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘साम वाहिनी’ घरबसल्या वारीची अनुभूती देणार आहे.

पुणे - ‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद...’ अशा ओळींचा गजर करीत लाखो वारकरी विठुमाउलीच्या भेटीसाठी पंढरीकडे निघणार आहेत. परंतु इच्छा असूनही ज्यांना वारीमध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘साम वाहिनी’ घरबसल्या वारीची अनुभूती देणार आहे. 

सोनाई पशू आहार प्रस्तुत ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हा कार्यक्रम पॉवर्ड बाय निसर्ग क्रॉप केअर (इं) प्रा. लि., को-पॉवर्ड बाय- बेडेकर, राजर्षि शाहू बॅंक, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस, सपकाळ नॉलेज हब यांच्या सहकार्याने ‘साम वाहिनी’वर सोमवारपासून (ता. २४) दाखविण्यात येईल. त्यातून विठ्ठलभक्तांना वारीचा आनंद घेता येणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे पुन:प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता होईल.

आषाढी वारी, वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तसेच महाराष्ट्राच्या अन्य भागांतून पंढरपूरला येणाऱ्या संतांच्या पालख्या आदी विषयांच्या सविस्तर माहितीबरोबरच संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान, उभे रिंगण, गोल रिंगण, भजन, भारूड, कीर्तनांचा आनंदही दर्शकांना घरबसल्या घेता येणार आहे. 

तसेच वारीचा मार्ग, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा यांसह विविध गोष्टींची माहिती प्रेक्षकांपर्यत पोचवली जाणार आहे. ‘साम’चे प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saam TV Channel Pandharichi Wari