होय, युती झाली आहे!

shivsena-bjp
shivsena-bjp

मुंबई : विधानसभा निवडणूक युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर 'सामना'ने आज (बुधवार) अग्रलेखातून 'होय, युती झाली आहे!' असे लिहून अधिकृत जाहीर केले आहे. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून, या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळाले आहे तिथे शंभर टक्के यश मिळवणारच, असा निर्धारही व्यक्त केला आहे. राज्यात विरोधकांची अवस्था फाटकी-तुटकी अशी झाल्याची टिकाही अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटके-तुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. 'युती'त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे आणि रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!

पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने पक्ष पदाधिकारी 'मातोश्री'वर जाऊन बसले आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ सिद्धार्थ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही विरोध सुरू झाला आहे. पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न सोडल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवाजीनगरमधून उत्सुक असलेले माजी पोलिस अधिकारी भानू प्रताप बर्गे यांनी तर थेट अपक्षच लढण्याची घोषणा केली आहे. विजय शिवतारे यांनीही विधानसभेसाठी शिवसेनेने उमेदवारी दिली म्हणजे आमच्यावर उपकार केलेले नाहीत. आम्ही कष्ट केले आहेत, असे रोखठोक मत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

काय म्हटले आहे अग्रलेखात...
शिवसेना-भाजप युतीवर अखेर मोहोर उठली आहे. दोन्ही बाजूच्या जबाबदार नेत्यांच्या सही-शिक्क्याने संयुक्त पत्रक निघाले. तरीही प्रश्न विचारला जातोच की, ‘युती’ची अधिकृत घोषणा कधी होणार? नक्की जागांचे वाटप कसे झाले? प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरेही तुम्हीच तयार करून ठेवायची. त्यानुसार ‘मीडिया’ने जागावाटपाचा आकडाही जाहीर करून टाकला आहे. युती म्हटली की, देवाण-घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठय़ा मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण भाजपच्या पदरात ‘मित्रपक्ष’ नामक दत्तक विधानेही जास्त आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत गोळाबेरीज झाली व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढवण्याचे ठरवले. तयारी तशी 288 मतदारसंघांचीच होती. शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण होतेच. चि. आदित्यच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनआशीर्वाद मिळवला व त्याच आशीर्वादाच्या बळावर आदित्यही वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com