#saathchal वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त पंढरीकडे निघालेला संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा टाळ-मृदंगाचा गजर आणि "ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ' असा जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून जातो. वैष्णवांच्या या मेळ्यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, या उद्देशाने "सकाळ' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' कंपनी यंदा "वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "साथ चल' हा उपक्रम राबविणार आहे.

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त पंढरीकडे निघालेला संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा टाळ-मृदंगाचा गजर आणि "ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ' असा जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून जातो. वैष्णवांच्या या मेळ्यात सहभागी होऊन भाविकांनी आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, या उद्देशाने "सकाळ' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' कंपनी यंदा "वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "साथ चल' हा उपक्रम राबविणार आहे. त्याला आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांचे सहकार्य लाभले आहे. 

"साथ चल' उपक्रमात वाटचालीचे दहा टप्पे केले आहेत. पहिला टप्पा सहा जुलै रोजी निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी विठ्ठल मंदिर असा असेल. सात जुलै रोजी आकुर्डी विठ्ठल मंदिर ते दापोडी या दरम्यान सहा टप्पे असतील. तर नऊ जुलै रोजी पुण्यातील पुलगेट ते हडपसर गाडीतळ या दरम्यान तीन टप्पे असतील. प्रत्येक टप्प्यातील अंतर साधारणतः दीड ते दोन किलोमीटर असेल. प्रत्येक टप्प्यात सहभागी होणारे नागरिक वेगवेगळे असतील. प्रत्येक टप्प्यात सेलिब्रिटी व मान्यवर आणि सहभागी नागरिकांना कुटुंबाची विशेषतः आई-वडिलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याबाबत शपथ देतील. त्यानंतर पुढील टप्पा सुरू होईल. 

कोण होऊ शकतो सहभागी 
प्रत्येक टप्प्याच्या वाटचालीत दोन्ही देवस्थानचे विश्‍वस्त, मानकरी, परिसरातील भजनी मंडळे, गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, गृहनिर्माण सोसायट्या, व्यवस्थापन, राजकीय प्रतिनिधी, सेलिब्रिटी, व्यापारी, वकील, उद्योजक, साहित्यिक, कामगार संघटनांचे सदस्य, पदाधिकारी आदींना सहभागी होता येणार आहे. 

Web Title: #saathchal sakal and Finolex Cables for saathchal initiative for Ashadhi vari