संत तुकाराम महाराज पालखीचे वेळापत्रक तयार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे : आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक तयार झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा 5 जुलैला होणार असून, श्री क्षेत्र देहूतील इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी 6 जुलैला पालखीचे प्रस्थान होऊन अनगडशहा बाबा अभंग आरती, चिंचोली पादुका अभंग आरती करत निगडी मार्गे आकुर्डी मधील श्री विठ्ठल मंदीरात पालखीचा दुसरा मुक्काम असतो.

No automatic alt text available.

तिसऱ्या दिवशी म्हणजे 7 जुलैला संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात पोहचणार असून, नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदीरात पालखीचा तिसरा मुक्काम असतो. पुण्यातील 8 जुलैच्या एक दिवसाच्या मुक्कामानंतर 9 जुलैला पालखी पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान करेल.  

Web Title: #SaathChal Sant Tukaram Maharaj Palkhi Timetable 2018 Pandharichi Wari