सचिन वाझेंना पुन्हा धक्का; विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Sachin Wazes bail application rejected by special PMLA court
Sachin Wazes bail application rejected by special PMLA courtSachin Wazes bail application rejected by special PMLA court

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी (ता. २०) फेटाळला (bail application rejected) आहे. एनआयएने तपासातील माहितीच्या आधारे सचिन वाझे यांना १३ मार्च रोजी अटक केली होती. (Sachin Wazes bail application rejected by special PMLA court)

अँटिलिया विस्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अटकेत आहे. मागे सचिन वाझे यांनी हृदयशस्त्रक्रिया झाल्याने तुरुंगात पाठवण्याऐवजी घरातच नजरकैदेत ठेवावे, अशी विनंती केली होती. मात्र, सचिन वाझेची विनंती विशेष एनआयए कोर्टाने मागे नाकारली होती. आता विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला (bail application rejected) आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार आढळली होती. ती कार १८ फेब्रुवारी रोजी मुलुंड-ऐरोली पुलावरून चोरली होती. या कारचे मालक हिरन मनसुख यांचा मृतदेह ५ मार्च रोजी कळवा खाडीत आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ८ मार्च रोजी एनआयएने ताब्यात घेतला होता. एनआयएने तपासातील माहितीच्या आधारे सचिन वाझे यांना १३ मार्च रोजी अटक केली होती.

Sachin Wazes bail application rejected by special PMLA court
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली

ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात अटक झाल्यानंतर सचिन वाझे (Sachin Waze) यांना याआधीच निलंबित केले होते. जवळपास १७ वर्षांच्या निलंबनानंतर त्याला पुन्हा पोलिस सेवेत घेण्यात आले होते. मात्र, स्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सचिन वाझे यांना पुन्हा धक्का देत विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून (bail application rejected) लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com