'खुशाल थाळ्या वाजवा कारण तुमच्या हातात तेवढंच उरलंय'

'थाळी वाजवायची हौस आहे, तर वीज वितरणाच्या नावाने वाजवा'
Sadabhau Khot
Sadabhau Khotसकाळ डिजिटल टीम
Summary

'थाळी वाजवायची हौस आहे, तर वीज वितरणाच्या नावाने वाजवा'

सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून नेत्यांची टोलेबाजी सुरु आहे. राजकीय वर्तुळात होणाऱ्या बदलांमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एक ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी युवासेनेकडून राज्यभरात थाळी बजाओ आंदोलन करण्यात आलं. राज्यभरात थाळी नाद करत मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आता यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. खुशाल थाळ्या वाजवा कारण तुमच्या हातात तेवढंच उरलय, पण अख्ख्या महाराष्ट्राला सगळं कळून चुकलय, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

Sadabhau Khot
मविआवरील टीकेनंतर नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरात; युतीची चर्चा जोरात

सदाभाऊ खोत ट्विटमध्ये म्हणतात, खुशाल थाळ्या वाजवा कारण तुमच्या हातात तेवढंच उरलं आहे. पण अख्ख्या महाराष्ट्राला सगळं कळून चुकल आहे. थाळी वाजवायची हौस आहे, तर वीज वितरणाच्या नावाने वाजवा. पेट्रोल, डिझेल वरील टॅक्स वाढीवर वाजवा म्हणजे आपल्याच सरकारच्या बंद कानावर त्याच थाळीचा आवाज पडेल आणि माविकास आघाडी सरकार जागं होईल, असं त्यांनी सुचवलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. अनेक कारणांनी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीका सुरु आहेत. वाढत्या महागाईमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र दिवसेंदिवस महागाईचा उच्चांक वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यभर युवा सेनेच्या वतीने प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. काही महत्वाच्या मुद्द्यांवरूनही एकमेकांना निशाणा साधला जात आहे. यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला जाग येईल असं म्हणत टोला लगावला आहे.

Sadabhau Khot
NEET UG चं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार; जुलैमध्ये परीक्षा?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com