
“काँग्रेस-राष्ट्रवादीवासी झाल्याने राऊतांना दिसतो बजेट आभासी”
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं, असे संजय राऊत म्हणाले. यावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे.
सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रतिक्रीयेचा आशय देत राऊतांवर कवितेच्या लयीत टिका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, “सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं - संजय राऊत हे झालेत काँग्रेस राष्ट्रवादी वासी.. त्यामुळे ह्यांना दिसतोय अर्थसंकल्प आभासी... शिवसेनेच्या वाघाची केली तुम्ही माशी.. त्यामुळे तुमची झालीय आता माती... आता केंद्राच्या नावाने रात्रंदिवस बोट मोडत राहशी”
हेही वाचा: जनतेच्या मानसिक आरोग्याची सरकार घेणार काळजी; 'टेलिमेन्टल हेल्थ'ची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. यावर शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा व शेतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
Web Title: Sadabhau Khot Reacted On Sanjay Rauts Statement On Budget 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..