सदाभाऊंना आली मंत्रालयात चक्कर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मंगळवारी सायंकाळी मंत्रालयातील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनात चक्कर आल्याने डॉक्‍टरांना पाचारण करावे लागले. त्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी निवासस्थानी नेण्यात आले.

आज सायंकाळी मंत्रिमंडळ बैठक असल्याने मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांची गर्दी होती. सदाभाऊ यांना भेटण्यासाठी अनेक लोक त्यांच्या दालनात आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने खाली पडले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून डॉक्‍टरांना पाचारण केले. यापूर्वी सदाभाऊ यांना दौऱ्यावर असताना चक्कर आली होती.

Web Title: sadabhau khot sickness