शेवटच्या क्षणी फडणवीसांची खेळी; सदाभाऊंचा विधान परिषदेसाठीचा अर्ज मागे

काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्यास भाजपनेही उमेदवार मागे घ्यावा, अशी ऑफर देण्यात आली होती.
Sadabhau Khot, Devendra Fadnavis
Sadabhau Khot, Devendra FadnavisEsakal

राज्यसभेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी आता सर्वच पक्ष करत आहेत. यासाठी भाजपाने पाच जागा लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून सदाभाऊ खोतांना पाठिंबा दिला होता. मात्र आता सदाभाऊ खोतांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. (Sadabhau Khot Meets Devendra Fadnavis over MLC Election 2022)

Sadabhau Khot, Devendra Fadnavis
288 आमदार आहेत, शक्य तेवढ्यांना फोन करणार; सदाभाऊ खोत लागले तयारीला

या प्रकरणी काही वेळापूर्वीच सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीसांना भेटले होते. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. ही मुदत संपण्याच्या अवघ्या काही मिनिटं आधी सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसकडून ही निवडणूक बिनविरोध कऱण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्यास भाजपनेही उमेदवार मागे घ्यावा, अशी ऑफर देण्यात आली होती. अखेर भाजपाने त्याचा अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यासोबत राष्ट्रवादीचे डमी उमेदवार शिवाजीराव गर्जे यांनीही अर्ज मागे घेतला आहे. (Sadabhau Khot Latest News)

Sadabhau Khot, Devendra Fadnavis
भाजप सहा जागा लढवण्यावर ठाम, सदाभाऊ पोहोचले फडणवीसांच्या भेटीला

भाजपने सहाव्या जागेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवलं होतं. अखेर अर्ज मागे घेत भाजपाने त्यांचा इरादा स्पष्ट केला. यानंतर भाजपा पाच जागांवर तर महाविकास आघाडी सहा जागांवर लढणार हे स्पष्ट झालं आहे. (MLC Election 2022)

विधान परिषदेसाठीचे उमेदवार -

  • शिवसेना - सचिन अहिर, आमश्या पाडवी

  • राष्ट्रवादी काँग्रेस - रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

  • काँग्रेस - भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

  • भाजपा - प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com