अनिल परब यांच्या अडचणीत वाढ? सदानंद कदम यांना ईडीकडून अटक Dapoli Sai Resort scam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED raids in Mumbai Nagpur Assets worth crores seized Investment scam crime police

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ? सदानंद कदम यांना ईडीकडून अटक Dapoli Sai Resort scam

Dapoli Sai Resort scam: दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सकाळी सदानंद कदम यांना चौकशीसाठी ईडीचे अधिकारी मुंबईत घेऊन गेले होते. ईडीने कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी केली.चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता.

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच कदम यांना ईडीनं अटक केल्याने. अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaArrestedED