सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस, ED ची नाही : सुप्रिया सुळे

Supriya Sule
Supriya Suleesakal
Summary

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय.'

कऱ्हाड (सातारा) : सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना इन्कम टॅक्सची नोटीस (Income Tax Notice) आली आहे, इडीची (ED) नाही. आम्ही दोषी नाही आहोत, असं सांगितलंय. मी कोणतीही तक्रार केली नव्हती. मी लढणार आहे, अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज शुक्रवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथे केली.

खासदार सुळे कऱ्हाड दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या संगीता साळुंखे, राजेश पाटील-वाठारकर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, जयंत बेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Supriya Sule
Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात आता ED ची एन्ट्री

त्या पुढं म्हणाल्या, सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. इडीची नाही. आम्ही दोषी नाही आहोत, असं सांगितलंय. मी तक्रार केली नव्हती. मी लढणार आहे, असं सांगत त्या म्हणल्या, अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात, देशात महागाईचं मोठं आव्हान आहे. केंद्र सरकारकडं मी सातत्यानं खासदार म्हणून तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही केलेल्या सूचनांची अमंलबजावणी झाल्यास महागाईतून काहीसा दिलासा मिळण्यास मदत होईल.

Supriya Sule
फरार मल्ल्या-नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करणार : बोरिस जॉन्सन

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या (Adv. Gunaratna Sadavarte) प्रश्नावर त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो आणि त्याचे संस्कार असतात. माझं भाग्य आहे की, भारताचा सुपुत्र ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे माझ्यावर संस्कार आहेत. त्यामुळं असल्या गोष्टीवर बोलणं मला योग्य वाटत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळं त्यांच्यावर झालेल्या संस्कारानुसार ते बोलत असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com