विद्यार्थी काँग्रेसमध्येही राजीनामासत्र; प्रदेशउपाध्यक्षाचा राजीनामा

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर राज्य कार्यकारिणीवरील कोणीही राजीनामा देत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेकांनी राजीनामे देऊ केले असून हे राजीनामासत्र विद्यार्थी काँग्रेसमध्येही आले आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सागर साळुंके यांनी राजीनामा दिला आहे.

पुणे : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर राज्य कार्यकारिणीवरील कोणीही राजीनामा देत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेकांनी राजीनामे देऊ केले असून हे राजीनामासत्र विद्यार्थी काँग्रेसमध्येही आले आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सागर साळुंके यांनी राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदी न राहण्याची भूमिका घेतली. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, अशी कॉंग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र सुरू झाले असून लोकसभेतील पराभवाची जबाबदार घेत अनेकांनी राजीनामे दिले आहेत. काल (ता.29) नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, सागर साळुंके यांनी वरूण चौधरी राष्ट्रीय सचिव (प्रभारी, महाराष्ट्र राज्य) यांना पत्राद्वारे आपला राजीनामा सादर केला आहे. 2019 सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा झालेला लाजिरवाणा पराभव एक कॉंग्रेस कार्यकर्ता या नात्याने जिव्हारी लागलेला असून पदाला चिकटून राहण्यात स्वारस्य वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagar salunke resign as vice president of Maharashtra NSUI