Anil Parab: अनिल परब यांना मोठा दिलासा; हायकोर्टाचे ईडीला महत्वाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Resort Dapoli Anil Parab ED bombay high court hearing Maharashtra

Anil Parab: अनिल परब यांना मोठा दिलासा; हायकोर्टाचे ईडीला महत्वाचे आदेश

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहेत. साई रिसॉर्ल्ट प्रकरणी परब यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती.(Sai Resort Dapoli Anil Parab ED bombay high court hearing Maharashtra )

दोनदिवसांपूर्वी दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर परब यांनी कोर्टात धाव घेतली होती. काही तासांपूर्वीच, जयराम देशपांडे अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता.

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

टॅग्स :Aanil parab