सज्जनगड वाचतोय समस्यांचा पाढा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

परळी - ‘‘ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. तू विवंचना दूर होण्याचे स्थान मुक्त आहेस. परंतु, पुन्हा विवंचनायुक्त आहेस’’, असा सज्जनगडावरील समर्थ महाद्वारातून आत जाताना लागणाऱ्या भिंतीवर कोरलेला शिलालेख प्रत्यक्षात मात्र सज्जनगडच अनुभवत असल्याचे दिसत आहे. 

गडाची चढाई करतानाचा खडतर रस्ता, जाताना आजूबाजूला असलेली झुडपे, त्यामध्ये अडकलेले कागद आणि प्लॅस्टिकचा कचरा, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य, मोडकळीस आलेली व्यवस्था याचे प्रतीक म्हणजे सज्जनगड दिसू लागला आहे. अशाच वातावरणात सज्जनगडावर दासनवमीचा उत्सव लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे गडाची आणि भाविकांचीही विवंचना वाढली आहे. 

दासनवमीनिमित्त नऊ दिवस सज्जनगडावर लाखो भाविक येतात. यावर्षी या भाविकांना गडावर पोचण्यासाठी बहुतेक पालखीचाच आधार घ्यावा लागणार आहे. कारण गडावर पोचणारा रस्ता खड्ड्यांचा झाला आहे. गडावर पार्किंगची व्यवस्था असली तरी जागा पुरेशी नाही. अनेक वळणांवर दरडी पडल्या आहेत. गडाच्या बसथांब्यावर आल्यावरच येथील बकालपणा जाणवतो. वर्षभर फिरणाऱ्या दिंड्या आता गडावर पोचल्या आहेत. त्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. त्याबरोबरच ग्रामपंचायतीचेही सहकार्य गरजेचे आहे. 

गडावरील पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. परळी गावातून येणारा रस्ता बंद होण्याच्या स्थितीत आहे. कचऱ्यासाठी ठेवण्यात आलेल्या कुंड्या गंजून तुटल्या आहेत. गडावरील तळ्यांमधील पाणी हिरवेगार झाले आहे तर त्यातून पुढे जाणाऱ्या लोकांना कुठून चालावे, हेच कळत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. 

सज्जनगडावरील श्रीरामांच्या मंदिराचा घुमट नव्याने साकारण्यात आला आहे. या मंदिराच्या मागील बाजूस धाब्याच्या मारुतीकडे जाताना समोर उरमोडी धरणाचे विहंगम दृश्‍य दिसत असले तरी भाविकांसाठी करण्यात आलेला पदपथ उद्धवस्त झाला आहे. स्वच्छतागृहाची दारे कधीच गायब झाली आहेत आणि विसावा कुटींवर  छतच पडलेले नाही. अशा अवस्थेत होणारी यात्रा भाविकांसाठी अमरनाथ यात्रेसारखी कष्टप्रद वाटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये.

प्रशासनाच्या कार्यवाहीकडे डोळे...
यात्रेच्या काळातच निवडणुका आल्याने बंदोबस्तासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त देण्यास प्रशासनाची अडचण आहे. यात्रा काळात गर्दीच्या तुलनेत एसटी बसची व्यवस्था अपुरी पडते. त्यातच स्वच्छतेबाबत काळजी घेण्याची मागणी होत आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत प्रशासन काय निर्णय घेणार, याकडेच ग्रामस्थ आणि भाविकांचे डोळे लागले आहेत.

Web Title: sajjangad issue