'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धेची नावनोंदणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे

पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे
शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्याच्या संधी मिळतात; मात्र अनेकदा गुणवत्ता असूनही निमशहरी, ग्रामीण भागातील तरुणींना पुरेशा संधी मिळत नाहीत. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील गुणवत्ता समोर येईल.

केवळ सौंदर्याला नव्हे; तर तरुणींमधल्या कलागुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळू शकेल. महाराष्ट्रात आठ केंद्रावर या स्पर्धेच्या ऑडिशन्स घेतल्या जातील. ही स्पर्धा 18 ते 25 वयोगटातील अविवाहित तरुणींसाठी असून स्पर्धेसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता योणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता.26) www.sakalbeautyofmaharashtra.in येथे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. नोंदणी फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करता येणार आहे. नावनोंदणी केलेल्यांना स्पर्धकांची योग्यता पारखून त्यांना ई-मेलद्वारे ऑडिशनसाठी बोलवण्यात येईल. "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धेच्या ऑडिशन्स जिल्हा स्तरावर होणार असल्याने तालुक्‍यातील तरुणींना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. ऑडिशन्समधून स्पर्धक तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड होईल. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांचे ट्रेनिंग आणि ग्रुमिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात करण्यात येईल.

स्पर्धेची अंतिम फेरी 16 फेब्रुवारी रोजी (शनिवार) पुण्यात होईल. या स्पर्धेचे फॅशन कोरिओग्राफर आणि टेलेन्ट ग्रूमर लवेल प्रभू, तर श्रुती मंगेश डिझाइन व कॉस्च्यूम पार्टनर आहेत. ऍमनोरा पार्क टाऊन लाइफस्टाईल पार्टनर आहेत.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी - www.sakalbeautyofmaharashtra.in
स्पर्धेचे अपडेटस मिळवण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर फॉलो करा sakalbeautyofmaharashtra

"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019'
ऑनलाइन नोंदणी : शनिवार ता. 26 जानेवारीपर्यंत

ऑडिशन्स तारीख , शहर ऑडिशनचे ठिकाण
29 जानेवारी नाशिक सिटी सेंटर मॉल, दुसरा मजला, उंटवाडी रोड, नाशिक
30 जानेवारी ठाणे हॉटेल टीप टॉप प्लाझा, एलबीएस रोड, रहेजा गार्डनसमोर, ठाणे (वेस्ट)
30 जानेवारी नागपूर हॉटेल द्‌ नागपूर अशोका, लक्ष्मीनगर, नागपूर.
31 जानेवारी औरंगाबाद विवेकानंद आर्ट, सरदार दलिपसिंग कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज, क्रांती चौक, औरंगाबाद
2 फेब्रुवारी कोल्हापूर रिलायन्स मेगा मॉल, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
4 फेब्रुवारी सोलापूर ए. डी. जोशी सभागृह, इंडियन मॉडेल स्कूल, जुळे सोलापूर.
5 फेब्रुवारी जळगाव हॉटेल फोर सिझन्स रिक्रिएशन प्रा.लि. जळगाव
6 फेब्रुवारी पुणे ऍमनोरा द फर्न हॉटेल्स ऍण्ड क्‍लब, हडपसर, पुणे.

Web Title: Sakal beauty of Maharashtra 2019 Competition Registration