सहभागासाठी लाखो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - कलेच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या विद्यार्थिप्रिय ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’ला राज्यभरातून; तसेच अन्य राज्यांतल्या आणि विदेशांतल्या विद्यार्थी चित्रकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या १६ तारखेला (रविवार) महाराष्ट्र व गोव्यातल्या दोन हजारांहून अधिक केंद्रांमध्ये ही स्पर्धा एकाच वेळी होईल. रंगांच्या अनोख्या दुनियेचा आनंद लुटण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

‘सकाळ’च्या वाचकांच्या तीन पिढ्यांना जोडणारा आणि रंग-रेषांचे आकर्षक विश्‍व खुले करत उमलत्या पिढीला सर्जनशीलतेच्या वाटेवर अलगद घेऊन जाणाऱ्या उपक्रमाचे हे ३३वे वर्ष आहे. राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळा, विशेष मुलांसाठीच्या शाळा स्पर्धेत सहभागी होत आहेत. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेत सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे विनामूल्य दिला जाईल. मात्र स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांचा सविस्तर तपशील ‘सकाळ’मधून लवकरच प्रसिद्ध होईल. स्पर्धेसाठीची नावनोंदणी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतून करायची आहे. मात्र शाळेतून नोंदणी न झाल्यास स्पर्धेच्या दिवशी जवळच्या केंद्रात येऊन स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. महाराष्ट्राबाहेरचे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष सहभाग घेणे शक्‍य होणार नाही, असे विद्यार्थी chitrakala.esakal.com या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा; तसेच विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 

स्पर्धेबाबत माहिती...

     महाराष्ट्र आणि गोव्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. 
     ‘गट अ’ ः इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ ः इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ ः इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ ः इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. 
    स्पर्धेची वेळ ः
     ‘अ’ व ‘ब’ गटांसाठी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० 
     ‘क’ व ‘ड’ गटांसाठी सकाळी ९ ते १०.
     सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुलांनाही 
    या स्पर्धेत सहभागी होता येईल.

Web Title: Sakal Drawing competition on 16th December good response to millions of students