देशातली सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा उद्या

Sakal-Drawing Competition
Sakal-Drawing Competition

विशेष कूपन भरा व स्पर्धेत विनामूल्य सहभागी व्हा; आश्रमशाळा, विशेष मुलांना विनाशुल्क प्रवेश
पुणे - रंग, रेषा, छटांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणारी ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ रविवारी (ता. १२) सकाळी महाराष्ट्र आणि गोव्यात एकाच वेळी होत आहे. राज्यातल्या महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील ही स्पर्धा केंद्रे रविवारी सकाळी नव्या कल्पनांचे रंग घेऊन येणाऱ्या बालचित्रकारांचे स्वागत करायला सज्ज झाली आहे. देशातल्या या सर्वांत विद्यार्थिप्रिय स्पर्धांमध्ये गेल्या ३४ वर्षांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे या स्पर्धेलाही बालचित्रकारांनी आपली कल्पनाशक्तीचे रंग कागदावर उतरविण्यासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘सकाळ’मध्ये दि. ३, ५, ७ आणि ९ तारखेला प्रकाशित झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना  http://bit.ly/२sAmK१H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येईल. आदिवासी आश्रमशाळा आणि विशेष मुलांनी कोणतेही कूपन अथवा प्रवेश शुल्क भरण्याची आवश्‍यकता नाही. पूर्ण भरलेले विशेष कूपन आणि प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे.

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणारे उपक्रम हा ‘सकाळ’च्या वाटचालीतला महत्त्वाचा भाग आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’ हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. तीन पिढ्यांना जोडणारी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
यंदाही ही स्पर्धा इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. 
दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे विनामूल्य दिला जाईल. मात्र स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. 

स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. 

असे व्हा सहभागी
- घराजवळील स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन घेऊन स्पर्धेत सहभागी व्हा. भरलेले कूपन पुन्हा एकदा तपासा
- विशेष कूपन भरू न शकल्यास http://bit.ly/२sAmK१H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा किंवा 
- मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा. (महत्त्वपूर्ण सूचना ः क्‍यू आर कोड द्यावा)

स्पर्धेला जाताना...

  • चित्र काढण्यासाठी स्पर्धक काळी किंवा रंगीत पेन्सिली, क्रेयॉन्स (रंगीत खडू), पोस्टर कलर्स, ॲक्रॅलिक कलर्स, स्केच पेन्स आदी माध्यमांचा स्वतंत्र किंवा एकत्रित वापर करू शकतात. 
  • चित्र काढताना आकारांची मांडणी, लय, हावभाव, प्रमाणबद्धता याकडे लक्ष द्या.
  • चित्र दिलेल्या वेळेत पूर्ण करा. 
  • तुमचे चित्र कोणत्याही चित्राची प्रतिकृती असू नये. ती तुमची स्वतःची अभिव्यक्ती असावी.
  • चित्र काढताना नवनवीन पद्धतींचा वापर करून चित्रकलेतला आनंद घ्या. आपल्या मनातील भाव कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करा. 
  • स्पर्धेत भाग घेऊन मज्जा करा, आनंद लुटा.
  • सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com