मानस, निष्का, आदर्श, प्रसाद राज्यात प्रथम

Sakal-Drawing-Competition-Result
Sakal-Drawing-Competition-Result

पुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’त सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये ‘अ’ गटात मानस रविकिरण इंगळे (नाशिक), ‘ब’ गटात निष्का एन. विरकर (विक्रोळी, मुंबई), ‘क’ गटात आदर्श प्रकाश लोने (पुणे) आणि ‘ड’ गटात प्रसाद सुनील बोस्टे (नेवासा, जि. नगर) यांनी राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राज्यपातळीवर ‘अ’ गटात सुमित मोहन उघडे (घाटघर, जि. नगर), ‘ब’ गटात भावेश संपत भांडकोळी (इगतपुरी, जि. नाशिक), ‘क’ गटात राजू बच्चू पोकळे (घाटघर, जि. नगर) आणि ‘ड’ गटात अश्‍विनी रामचंद्र मधे (इगतपुरी, जि. नाशिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

महाराष्ट्र आणि गोव्यातल्या दोन हजार केंद्रांवर गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येची दखल घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या दोन संस्थांनी २०१८च्या स्पर्धेने ‘सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम प्रस्थापित झाल्याचे त्याच दिवशी जाहीर केले होते. ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’च्या वताने याबाबतचे प्रमाणपत्र आणि पदक ‘सकाळ’कडे सुपूर्त केले होते. या विक्रमामुळे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली ही स्पर्धा नव्या उंचीवर पोचली आहे.

तीन पिढ्यांना जोडणाऱ्या देशातल्या या सर्वात विद्यार्थिप्रिय स्पर्धांमध्ये गेल्या ३३ वर्षांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे.

दर वर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत अगदी छोट्या गावांमधील शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबर आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थीही सहभागी झाले होते.

झेड. एफ. इंडिया प्रा. लि. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’चे टायटल प्रायोजक, इंडियन ऑईल कॉर्पोरेट पार्टनर, झी युवा एन्टरटेन्मेंट पार्टनर तर लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटी व सृजन कॉलेज ऑफ डिझाइन सहप्रायोजक होते.  

यानंतर टप्प्याटप्प्याने विभागपातळी व केंद्रपातळीचा निकाल प्रसिद्ध होतील. तसेच राज्यपातळीवरील सर्व विजेत्यांना पारितोषिकांबाबत लवकरच कळविण्यात येईल. विभाग व केंद्रपातळीवरील विजेत्यांना त्यांच्या शाळेमार्फत लवकरच बक्षिसे पोच केली जातील. राज्य पातळीवरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विजेत्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे तपशीलही लवकरच जाहीर केले जातील.

सविस्तर निकाल -
राज्यपातळी निकाल 
सर्वसाधारण विभाग

प्रथम - मानस रविकिरण इंगळे, न्यू ईरा इंग्लिश मिडीयम स्कूल, नाशिक

द्वितीय - साईराज वाल्मिक कांबळे, जानकीबाई केशव लिमये, प्रा. शाळा, पाली, ता. सुधागड

तृतीय - झोया आरिफ खान, गोतुळ इं. मि. स्कूल, ता. केलापूर, जि. यवतमाळ

उत्तेजनार्थ - खुशी हिम्मत पाटील जि. प. मराठी मुलींची शाळा, ता. धरणगांव, जि. जळगांव, आर्यन एस. शिळीमकर, रयत इ. मि. स्कूल, सातारा, श्रीजा सी. शेटगांवकर, रोझरी कॉन्व्हेंट हायस्कूल, पेडणे, गोवा, विराज शिरिष भोकरे, महाराज इंग्लिश स्कूल, कोल्हापूर, सिद्धी प्रदिप सरवळे. जि.प.प्राथ. शाळा, अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर. 

ब गट 
प्रथम - निष्का एन. विरकर उदयांचल प्राय स्कूल, विक्रोळी, मुंबई. 

द्वितीय - साईकिरण सी. शिंदे, सेंट मिरा इंग्लिश मि. स्कूल, अंगोल, ता. बेळगांव, जि. बेळगाव, कर्नाटक

तृतीय - तन्मय माधव जऊळकार, निशू निर्सरी ऍण्ड कोठारी कॉन्व्हेंट स्कूल, अकोला

उत्तेजनार्थ - दर्शन शशिकांत शेवाळे, आयडीअल इंग्लिश मिडियम स्कूल, देवळा, ता. देवळा, जि. नाशिक, आदित्य संजय मरगळे, अचिव्हर्स हाईटस्‌ इंटरनॅशनल स्कूल, शहादा, जि. नंदुरबार, निवेदिता, के.व्ही. झेड स्कूल, वास्को, गोवा, दिशा मुकेश लांडगे, उज्ज्वल उच्च प्राथ. शाळा, ओमनगर, नागपूर, जय योगेश डाळवाले, केशर एज्यु. फाऊंडेशन स्कूल, अहमदनगर

क गट
प्रथम - आदर्श प्रकाश लोने, केंद्रीय विद्यालय सदर्न कमांड, कॅम्प, पुणे

द्वितीय - रोहन दिपक पोवार, अशोका हायस्कूल, इचलकरंजी, हातकणगंले, कोल्हापूर

तृतीय - हर्षदा अनिल मोरे, पी.एम.सी. माध्य. विद्या. बामखेडा, काकदी, ता. शहादा, जि. नंदुरबार

उत्तेजनार्थ - भुमिका राकेश जालान, भारत ज्ञान मंदिरम कॉन्व्हेंट स्कूल, वर्धा, गौरवी गिरीश गुंडेवार, गांधी विद्यालय, एकतानगर, परभणी, संस्कृती कृष्णा महाबळ, बालमोहन विद्यामंदिर, मुंबई, नाईक सुरज वेसना, ओम गुरुदेव इं. मि. गुरुकुल, कोकमठाण, जि. अहमदनगर, अथर्व मिलींद लोटके, सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूर, जि. सोलापूर. 

ड गट 
प्रथम - बोस्टे प्रसाद सुनिल, ज्ञानोदय इंग्लिशस्कूल, नेवासा, जि. अमहदनगर

द्वितीय - सुमित सुधीर बांगर, प्रियदर्शनी इं.मि. स्कूल, इंद्रायणीनगर, भोसरी, पिंपरी

तृतीय - भुषण वसंत गायकवाड, गुरु गोविंदसिंग पब्लिक स्कूल, वडाळा पाथर्डी फाटा, नासिक

उत्तेजनार्थ - सुदिप एस. हेगडे, एम.व्ही. हेरवाडकर इंग्लिश मि. स्कूल, ता. बेळगांव, जि. बेळगांव, ललिता संजय पाटील, जि.एन. पाटील कन्या हायस्कूल, शिरूड, ता. जि. धुळे, दर्पण डि. महाजन, गायत्री कॉन्व्हेंट स्कूल महाल, प्रचिती ए. कुलत होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, अकोला, जि. अकोला, सृष्टी उदयसिंग राजपूत, पायोनिअर इंटरनॅशनल स्कूल, जालना रोड. ता. भोकरदान, जि. जालना, सुजल विजयकुमार शिरोडकर, सेंट मेरिज हायस्कूल, फोंडा, गोवा.

आश्रमशाळा विभाग
अ गट

प्रथम - सुमित मोहन उघडे, शासकीय आश्रमशाळा, घाटघर, ता. अकोले, जि. नगर

द्वितीय - अंजना शिवलाल सुर्यवंशी, अनुदानित प्राथ. व माध्य. आश्रमशाळा, नांद्रे, ता. धुळे

तृतीय - प्रियंका दत्तात्रय माळी, प्राथ. आश्रमशाळा, खडकेद, ता. इगतपुरी, जि. नाशिक

उत्तेजनार्थ - रोहित गिन खालको, स्व. भाऊराव पाटील चटप प्राथ. आश्रमशाळा, कोरपना, मु. वाळदी 

ब गट
प्रथम - भावेश संपत भांडकोळी, प्राथमिक आश्रमशाळा, खडकेद, ता. इगतपुरी, जि. नासिक

द्वितीय - ज्ञानेश्‍वरी बाळू खडके, अनुदानित प्राथ. आश्रमशाळा, राजूर, ता. अकोले, जि. नगर

तृतीय - संध्या चुनीलाल वसावे, अनुदानित प्राथ. आदिवासी आश्रमशाळा, मेहुणबारे

उत्तेजनार्थ - दिनेश धानक मंडाळी, स्व. त्रिवेणीबाई डोहे मा. आश्रमशाळा, मांडवा, ता. कोरपना, जि. चंद्रपूर. 

क गट
प्रथम - राजू बच्चु पोकळे, शासकीय माध्य. आश्रमशाळा, घाटघर, ता. अकोले, जि. नगर

द्वितीय - राहुल पिंट्या शिंदे, शासकीय आश्रमशाळा, ता. साक्री, जि. धुळे

तृतीय - गायकवाड दिपक पोपट, शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, कठइर दिगर, पुणेगाव, ता. कळवण, जि. नाशिक

उत्तेजनार्थ - सुजल विलास वाकडे, शासकीय माध्य. आश्रम शाळा, जाभुळघार

ड गट
प्रथम - आश्‍विनी रामचंद्र मधे, शासकीय माध्य व उच्च माध्य. आश्रमशाळा, केळी रूम्हणवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक

द्वितीय - दिपक विठ्ठल गांगुर्डे, अनुदानित माध्य. आश्रमशाळा, अलंगुण, ता. सुरगणा, जि. नाशिक

तृतीय - किशोर अशोक पाडवी, वनवासी विद्यालय, चिंचवाडा

उत्तेजनार्थ- गणेश गंभीर महावी, सौ. भाऊराव पाटील चटप माध्यम. आश्रमशाळा, कोरपना, ति. जिवती, जि. चंद्रपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com