सकाळ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर;अनश्री, मानसी, यश, पूर्वा राज्यात प्रथम

sakal drawing competition 2020
sakal drawing competition 2020

अलशिफा, भागवत यांचीही बाजी
पुणे  - रंग, रेषा, आकाराच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांची कल्पनाशक्ती खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३४ व्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. ही स्पर्धा १२ जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा येथे झाली होती. 

‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.सर्वसाधारण गटामध्ये अनश्री सोयाम (नागपूर), ब गटात मानसी परशराम गेनजी (बेळगाव), क गटात यश दिनेश पाटील (बेळगाव), ड गटात पूर्वा विजय गवळी (पुणे) यांनी राज्यपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

अपंग विभागातून अ गटात अलशिफा अन्वर खान (नगर), ब गटात भागवत रामनाथ शिंदे (कोपरगाव), क गटात प्रियांका जनार्दन जाधव (सातारा), ड गटात सत्यम परशुराम देशमुख हे विजेते ठरले आहेत. 

२०१८ मधील सकाळ चित्रकला स्पर्धेची नोंद नुकतीच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली आहे. या स्पर्धेची यापूर्वी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्येही नोंद झाली आहे. यंदाही या स्पर्धेत अगदी छोट्या गावांतील शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबर आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थीही सहभागी झाले होते. या निकालानंतर टप्प्याटप्प्याने विभागपातळी व केंद्रपातळीचे निकाल प्रसिद्ध होतील. 

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल उपळेकर, मुकीम तांबोळी, राहुल देशपांडे, पूनम राणा यांनी काम पाहिले आहे. या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - 

सर्वसाधारण विभाग 
अ गट - प्रथम - अनश्री सोयाम (सेंट व्हिन्सेंट स्कूल, रिंग रोड), द्वितीय- नभा प्रसाद कुलकर्णी (एस.पी.एम. पब्लिक स्कूल, विजयानगर, सदाशिव पेठ, पुणे), तृतीय - अजिंक्‍य मंगेश रहाणे (आत्मा मलिक इं. मि. स्कूल, कोकमठाण, जि. नगर), उत्तेजनार्थ - लावण्या चेतन शेलार (आदिनाथ इंग्लिश मि. स्कूल, मालेगाव, जि. नाशिक) प्रणव किरण धावडकर (जि. प. प्राथमिक शाळा, शिंदेवाडी (अनवली), ता. पंढरपूर, जि. सोलापूर), अनुष्का गणेश मते (कै. राठीबाई प्रा. इंग्लिश मि. स्कूल, मदनापूर, ता. माहूर, जि. नांदेड), हर्षल राजेंद्र जाधव (जि. प. शाळा नं.१, विसापूर, ता. तासगाव, जि. सांगली), विघ्नंता सुदेश खुळे (डॉ. के. बी. हेडगेवार प्रायमरी स्कूल, बाम्बोलिम, गोवा)

ब गट - प्रथम -  मानसी परशराम गेनजी (सेंट मेरीज हायस्कूल, कॅम्प, बेळगाव, कर्नाटक), द्वितीय - रितिका रवींद्र पाटील (जि. प. प्राथमिक शाळा, कोयाळी पुनर्वसन, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे), तृतीय - जयदीप विजय चव्हाण (स्व. मि. भी. छाजेड विद्यामंदिर, नांदगाव, जि. नाशिक), उत्तेजनार्थ - नयन चौडाप्पा कुंभार (ओंकार मराठी प्राथमिक प्रशाला, कुमठानाका, सोलापूर), आर्णा एस. प्रभूगावकर (श्री श्रद्धानंद स्कूल, कॅनाकोना, गोवा), अनुमित अमित पात्रे (जि. प. प्राथमिक शाळा, भोरवाडी, जि. नगर) प्रणय पवनकुमार डवंगे (अमरकोर विद्यालय, प्रतापनगर, भांडूप (प.), मुंबई), मानसी बाळा शहारे (जि. प. पूर्व माध्यमिक शाळा, निष्टी, ता. पवनी, जि. भंडारा),

क गट - प्रथम - यश दिनेश पाटील (जोशी सेंटर पब्लिक स्कूल, मंडोळी रोड, बेळगाव, कर्नाटक), द्वितीय- शरण्या भोसले (हचिंग हायस्कूल, कॅम्प, पुणे), तृतीय - नदीम अहमद अब्दुल हकीम (ए.टी.टी. हायस्कूल, ता. मालेगाव, जि.नाशिक), उत्तेजनार्थ- रिजुल नरेंद्र धुत (एस.ओ.एस., के.के., केशवनगर, जि. अकोला.), कृष्णा ज्ञानेश्‍वर कवडे (श्री साईनाथ हायस्कूल, आळकुटी, ता. पारनेर, जि. नगर), अनिष्का सचिन पवार (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, बीड), पूर्वा नीलेश वैती (एल.सी.सी.एस. इंग्लिश मि. हायस्कूल, म. साफळे, पो. उंबरपाडा, जि. पालघर), सई नरवडे (स्कूल ऑफ स्कॉलर्स, वनडोंगरी, नागपूर)

ड गट - प्रथम - पूर्वा विजय गवळी (प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय, पुणे) द्वितीय- अल्केश शंकरराव तरडे (डॉ. नांदुरकर विद्यालय, यवतमाळ), तृतीय- ललित दीपक शेवाळे (आत्मा मलिक माध्यमिक विद्यालय (गुरूकुल) कोकमठाण, जि. नगर), उत्तेजनार्थ - पारस विकास वंजारी (न्यू इंग्लिश स्कूल, सोमवारपेठ, सातारा), साहिल सुरेश मोवळे (न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख, जि. रत्नागिरी), गौतमी शेखर देसले (जनता विद्यालय, झोडगे, ता. मालेगाव, जि. नाशिक), विनी नवीन पाटील (पी.एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, पेण, जि. रायगड), भूमिका हंसराज पाटील (एच. आर. पटेल कन्या माध्यमिक स्कूल, शिरपूर, जि. धुळे)

बक्षीस वितरण समारंभ स्थगित
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर चित्रकला स्पर्धेचे आवृत्तीनिहाय बक्षीस वितरण समारंभाचे कार्यक्रम स्थगित केले आहेत. त्याऐवजी संबंधित शाळेत बक्षिसे पोच करून, शाळांतर्गत बक्षीस वितरण केले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com