"सकाळ'च्या पुढाकाराने एकाच वेळी चार विश्‍वविक्रम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

शेवगाव - आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येथे आयोजित हरिनाम सप्ताहात आज तब्बल एक लाख नऊ हजार आठशे जणांनी सामूहिक पसायदान पठण केले. "वंडर बुक ऑफ रेकॉर्डस'ने त्याबाबतच्या विश्‍वविक्रमाची नोंद केली. याशिवाय एक लाख जणांना पुरणपोळीचा महाप्रसाद, पंचवीस हजार जणांचा नेत्रदानाचा संकल्प व एक लाख जणांची ध्यानधारणा असे आणखी तीन विश्‍वविक्रमही याच वेळी नोंदविण्यात आले. 

आखेगाव (ता. शेवगाव) येथील सद्‌गुरू जोग महाराज संस्कार केंद्र व दहिगावने येथील दध्नेश्‍वर संस्थानाच्या पुढाकाराने येथे "विना देणगी, विना मानधन' तत्त्वावर आयोजित हरिनाम सप्ताहात हे विश्‍वविक्रम नोंदविण्यात आले. या दोन्ही संस्थांसह सकाळ सोशल फाउंडेशन, वारकरी शिक्षण संस्था व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. उद्धव नेवासेकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर पसायदानास प्रारंभ झाला. 

मारुती कुऱ्हेकर महाराज, शिवाजी देशमुख महाराज, राम झिंजुर्के महाराज, कृष्णदेव काळे महाराज, उद्धव नेवासेकर महाराज, "वंडर'च्या भारतातील प्रतिनिधी डॉ. स्वर्णश्री गुर्रम, "प्रजापिता'चे प्रशिक्षक दीपक हारके, आमदार बाळासाहेब मुरकुटे आदींसह प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

सामूहिक पसायदान पठणानंतर हारके यांनी सर्व एक लाख 9 हजार 800 जणांना ध्यानधारणेचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर 25 हजार 400 जणांनी नेत्रदानाचा संकल्प करणारे फॉर्म भरून दिले. सर्व एक लाख 9 हजार 800 जणांना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला. विश्‍वविक्रमासाठीचे सर्व सोपस्कार व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर डॉ. गुर्रम यांनी या चारही बाबींचा विश्‍वविक्रम झाल्याची घोषणा केली. त्याबाबतची प्रमाणपत्रेही गुर्रम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. बोठे पाटील यांनी "सकाळ'च्या विविध उपक्रमांची माहिती देऊन विश्‍वविक्रमाचा हेतू विशद केला. नीलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप खरड यांनी आभार मानले.

Web Title: Sakal four world record at the same time the initiative