नालासोपारा - ‘रहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात!’ या आशयाची बातमी रविवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच प्रसिद्ध कादंबरीकार गुरुनाथ नाईक यांच्या मदतीसाठी राज्यभरातून शेकडो हात पुढे आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नाईक कुटुंबीयांची भेट घेतली.
संबंधित वृत्त -
रहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात!
सरकारच्या माध्यमातून नाईक यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळामार्फत दिले. सरकारतर्फे नाईक यांना घर उपलब्ध झाले नाही तर त्यांची सर्व जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आयुष्याची ४० वर्षे वेचून रहस्यकथांच्या माध्यमातून नाईक यांनी वाचकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘सकाळ’च्या बातमीतून त्यांच्या व्यथा वाचकांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांना मदतीसाठी अनेकांचे ‘सकाळ’ कार्यालयात दूरध्वनीही आले. अनेकांनी त्यांच्याशी थेट संपर्क करून मदतीचा हात देत जगण्याचे बळ दिले. ‘तुम्ही हरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी ग्वाहीही अनेकांनी त्यांना दिली. ‘सकाळ’ने व्यथा मांडल्याबद्दल गुरुनाथ नाईक यांच्या पत्नी गीता नाईक यांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.
संबंधित वृत्त -
रहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.